लेबनॉन मध्ये पेजर हल्ला
लेबनॉनमधील हजारो पेजर बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने लेबनॉनमध्ये पोहोचण्यापूर्वी 5000 पेजर्समध्ये स्फोटके पेरली होती. प्रत्येक पेजरमध्ये मोसादने 3 ग्रॅम स्फोटके पेरली होती, असे बोलले जात आहे.
त्याचवेळी अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सने दावा केला आहे की, या हल्ल्यानंतर इस्रायलने अमेरिकन अधिकाऱ्यांना या कारवाईची माहिती दिली आहे. इस्रायलने अमेरिकेला सांगितले आहे की पेजरची ही नवीन तुकडी लेबनॉनला पोहोचण्यापूर्वी पुरवठा साखळी तोडण्यात यशस्वी झाली होती आणि प्रत्येक पेजरमध्ये बॅटरीजवळ स्फोटके पेरण्यात आली होती.
काम पूर्ण झाल्यावर अमेरिकेला सांगितले!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका अमेरिकन अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मंगळवारी ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर इस्रायलने अमेरिकेला याची माहिती दिली होती. पेजरमध्ये थोड्या प्रमाणात स्फोटके लपवून ठेवली होती आणि नंतर त्याचा स्फोट करण्यात आला, असे इस्रायलने सांगितले.
हे पण वाचा
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने पेजर बॉम्बस्फोट प्रकरणात वॉशिंग्टनची यात कोणतीही भूमिका नव्हती किंवा अमेरिकेचा त्यात सहभाग नसल्याचे म्हटले आहे. अमेरिकी अधिकारी याबाबत माहिती गोळा करत आहेत.
लेबनॉन-सीरियात ‘पेजर बॉम्ब’ने हल्ला
लेबनॉन आणि सीरियामध्ये मंगळवारी अचानक झालेल्या पेजर स्फोटात हजारो लोक जखमी झाले. या हल्ल्यासाठी हिजबुल्लाहने इस्रायलला जबाबदार धरले असून, या हल्ल्यासाठी इस्त्रायलला नक्कीच शिक्षा होईल असे म्हटले आहे. बुधवारी सकाळी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ते पूर्वीप्रमाणेच इस्रायलविरुद्धचे सामान्य हल्ले सुरूच ठेवतील, तर गुरुवारी हिजबुल्लाह प्रमुख हसन नसराल्लाह हे पेजर स्फोट प्रकरणी निवेदन देणार आहेत.
लेबनॉनमधील पेजर स्फोटात इराणचे राजदूत मोजतबा अमानी हेही जखमी झाले आहेत. रिपोर्ट्सनुसार, त्याने आपला एक डोळा गमावला आहे. पेजर स्फोटासाठी इराणनेही इस्रायलला जबाबदार धरले आहे.
पेजर स्फोटात 2 मुलांसह 12 जणांचा मृत्यू झाला
पेगासस स्फोटातील मृतांची संख्या 12 झाली असून त्यात 2 मुलांचा समावेश असल्याचे लेबनॉनच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, तुर्की, इराक, इराण, सीरिया आणि इजिप्तने रूग्णांवर उपचार करण्यासाठी मदत देऊ केली आहे. बेरूत विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराकी लष्करी विमान बुधवारी डॉक्टरांचे पथक आणि काही वैद्यकीय उपकरणे घेऊन बेरूतमध्ये उतरले. या विमानात 15 टन औषधे आणि वैद्यकीय उपकरणे होती.